STORYMIRROR

Sonali Butley-bansal

Romance

4  

Sonali Butley-bansal

Romance

जपलेली कुपी

जपलेली कुपी

1 min
208

 आनंद, उत्साह, हार ,फुलं ,रंग ,हळदी-कुंकू,

गजरे अन् संगीताची उधळण करत,

 एकमेकांचे हात हातात येताच

ज्या क्षणांच्या साक्षीने मी मोहरणार असते ,फुलणार असते, फळणार असते

त्या क्षणांच्या साथीने मनात जपलेलं उमटत जातं...


हरवलेल्या मला तू शोधावस,

विस्कटलेल्या मला तू नेटकं करावस,

कोलमडलेल्या मला तू सावरावस ,

बावरलेल्या मला ढाल बनावस ,


कोलमडलेल्या मला तू सावरावस,

विखुरलेल्या मला सांधावस ,

उमललेल्या मला घट्ट विणावस,

माझ्यातल्या मला तू ओळखावस ,


शिंपल्यातला मोती जसा जपतात तस अलगदपणे जपावस...

व्यवहाराच्या गाठी पडत जातीलही

 तसतशी जपलेली प्रत्येक गोष्ट कुपीबंद होत जाइलही कदाचीत 

कुपीबंद प्रत्येक गोष्टीस कस्तुरीसमच असं मानून

एक एक पाउल पुढे टाकत जाईन मी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance