जन्माची गाठ बांधताना
जन्माची गाठ बांधताना
जन्माची गाठ बांधताना
मन कासावीस होतं
जोडीदार समजून घेईल ना
या विचारांत लीन होतं..
जन्माची गाठ बांधताना
मनात नवं स्वप्नांची चाहूल
जणू प्रेमाच्या वाटेला पडणारं
ते पहिलच पाऊल...
जन्माची गाठ बांधताना
मन हिंदोळ्यावर झुले
नकळत या ओठांवरती
स्मितहास्य खुले..
जन्माची गाठ बांधताना
अवचित अंधार दाटे
भयावह विचाराचे वादळ
सर्वत्र थैमान घाले..
जन्माची गाठ बांधताना
मनात नुसतीच हूरहूर
हृदयाच्या आंतर हृदयी
का माजावा काहूर..
जन्माची गाठ बांधताना
विश्वासच संजिवनी
असे प्रेम सुख आनंद
तेव्हांच साऱ्यांच्या जीवनी...!!!