STORYMIRROR

Seema Kulkarni

Abstract

3  

Seema Kulkarni

Abstract

जिव्हाळा हृदयाचा

जिव्हाळा हृदयाचा

1 min
271

नाते जपले उरी एक वार,

 हवी कशाला उसनवार?

बंध जिव्हाळा बांधून ठेवी,

खुलण्या नात्याचे आकार. १.


मैत्री असो वा नाते अनामिक,

दृढ होण्या हा संस्कार,

जपता त्या ह्दयाची गाथा,

सद्गुणांचा जडो विकार २.


जिव्हाळ्याप्रति असे समर्पण,

संसाराचा मूळ आधार,

नात्यांमधली ओढ सूखवी,

जपण्या या आयुष्याचे सार. ३.


व्हावे आपण सर्वांचे,

प्रेमभावना ही लडिवाळ,

जिव्हाळ्याने जपता नाती,

होई बंध हे मवाळ. ४.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract