जीवनात या असे पुन्हा
जीवनात या असे पुन्हा
जीवनात या असे पुन्हा कोणी ना यावे कधी
सुखवितो येता, रडवून जाता
आता सहावे किती
जीवनात या असे पुन्हा कोणी ना यावे कधी
दरवळ हा..... पसरू नये
मृगजळ हे......विसरू नये
प्यावे कसे ते, तृप्ती न होते
त्याला भुलावे किती...
जीवनात या असे पुन्हा कोणी ना यावे कधी
उडती हे.... पक्षी नवे
ऋतू सरता.... जाती थवे
परदेसी तो, येतो नी जो, जातो भुलावे किती
जीवनात या असे पुन्हा कोणी ना यावे कधी
भासच हा..... गिरवू नये
जीवन हे..... हरवू नये
घडते, बिघडते,पाउलअडते,
परती फिरावे किती
जीवनात या असे पुन्हा कोणी ना यावे कधी
फूल फुलते.... गळते कधी
मन हळवे...... जळते कधी
आशा निराशा छळते जीवाला,
तिजला स्मरावे किती
जीवनात या असे पुन्हा कोणी ना यावे कधी
