जीवनाच्या वाटेवरी
जीवनाच्या वाटेवरी
जीवनाच्या वाटेवरी तू अन मी भेटलो
अनामिक वळणावरी होतो अनोळखी जरी
काहीतरी घडले बघ उरी
पाहताच तुला गेले भान हरपुनी
रात्रंदिवस तूच दिसे आता स्वप्नी
तुझेच रूप आता ठायीठायी
तूच सखा वसला मनी
तुझ्यातच बसले मी माझे मला हरवुनी
जीवनाच्या वाटेवरी हवास आता तूच सोबती
चालू आता सप्तपदी हात घेऊन घेऊनी हाती
जीवनाच्या वाटेवरी तू अन मी होऊ आता जीवनसाथी

