STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

जीवन एक संघर्ष

जीवन एक संघर्ष

1 min
229

  क्षणोक्षणी गाते मी

   ममतेची अमर गाथा,

   ज्यांनी घडविले जीवना

   त्या दैवतांची स्मरे कथा..


   डोईवरती छत्र धरूनी

    पथ जगण्याचा दाविला,

    त्या माता-पित्यास का मग

    वृद्धाश्रम दर्शविला...


    थरथरणाऱ्या हातांना आता

    ममतेची साथ हवीहवीशी,

    करूणामय नेत्रात आतातरी

    विश्वासाची भावना थोडीशी.


    ठेवूनी जाण त्या वृद्धत्वाची

   करू पाखरण अशी सुखाची,

    आयुष्याच्या सांजवेळी तरी

   झोळी भरू त्यांच्या श्वासांची.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational