जीवन अनुभव...
जीवन अनुभव...
डोळे निजले तरी
मन मात्र निजत नाही
पापणीतील स्वप्न आज
पापणीतही भिजत नाही
जरी जळून खाक झाली
ती राखही विझत नाही
शब्द-शब्द खेळ रचूनी
अपेक्षांची डाळच शिजत नाही
गिरवूनीया धडे जीवनाचे
प्रश्नांचे उत्तर सापडत नाही
हुंदके उधळूनी आकांक्षांचे
मन कसे धडपडत नाही?
सोशित सावलीतले उन्हाळे
का सावलीत बसवत नाही?
रूसलेल्या मनाच्या अपेक्षांना
का मन हे हसवत नाही?
भेदूनी शब्द बाण हृदयाला
का मरण ओढवत नाही?
सहनशीलतेचा अंत पहा
मरण जीवनास सोडवत नाही
