जीव लावला तुला
जीव लावला तुला
जीव लावला तुला त्याची
सजा मिळाली मजला गोड
तुझी दिवाणी आहे म्हणुन
ओळखी गली मोहल्ला रोड..
चर्चा झाली अपुल्या प्रेमाची
पाखरांची ही झाली गम्मत
वस्तीच्या कट्यावर संसर्ग
कळ्या फुले झुलती मस्तीत..
नाही केली कुणाची पर्वा
हवेत उडते धूंद काया
खलबली मचली आता
हसते ही वृक्षाची छाया..
मनात ही आली मदहोशी
आहे माझा प्रियकर हौशी
साथ चलूया साथ राहूया
चिंता ही कश्याची करशी..
गाजावाजा आधिच गाजला
प्रितीचा ताजमहाल बांधला
मंगळसुत्राची माळ घालूनी
टाका देवून राहूटी दाखला..

