जीव जडला
जीव जडला
तुझ्यावर जीव जडला,,
खूप खूप जीव जडला,,
पण का कुणास ठाऊक,,
जडल्यावर मात्र रडला.
जीव असा जडला की,
भान नव्हते कशाचे,
समोर एकच ध्येय होते,
तुझ्या माझ्या प्रेमाचे.
घेतल्या कितीतरी शपथा,
दिली कितीतरी वचने,
निभवायची असतात दोघांनी,
पण निभावली एकटीने.
मी मनापासून केलं होतं प्रेम,
तू मात्र समजला प्रेमालाच गेम,
जीव होता तुझ्यावर जडला,
पण तू तर डाव अर्धवट सोडला.
तुझ्यावर जीव जडला,,
खूप खूप जीव जडला,,
पण का कुणास ठाऊक,,
जडल्यावर मात्र रडला.

