STORYMIRROR

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Romance

3  

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Romance

झुळूक

झुळूक

1 min
236

प्रेम पाहिले जेव्हा तिजला

नयनामधल्या स्वप्न तरुला

फुलू लागली फुले सुगंधी

त्या कोमल लावण्याची


दृष्टी भेट ती क्षण भराची

सांगत नाती युगायुगांची

भासे कधी ती शकुंतला 

कधी राधिका कृष्णाची


झुळूक जशी ती हळूच येते

कळी परी ती किंचीत हसते

फुला परी ती मला फुलवते

ती प्रज्ञा माझ्या रचनांची


हसते तेव्हा ही मज दिसते

असते तेव्हा नवल काय ते

हास्य लोचनी तिच्या सांगते 

हसणे किमया जगण्याची 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance