STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Inspirational

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Inspirational

झळा उन्हाळ्याच्या

झळा उन्हाळ्याच्या

1 min
207

असह्य झाला आज साजणे कडक उन्हाळा

गरम पवन हा तना मारतो मरणांत झळा


कुठे आटला माणसातला प्रेम जिव्हाळा

स्वप्नी धुक्यात कुठे हरवला थंड हिवाळा


वास्तवाचेच निखार पेटी ऋतू वेगळा

पावसातील थेंब मागतो प्रेम आंधळा


शिकून सजणे जीवनातील घेशील धडा

आग ओकतो तप्त होऊन सुधाकर खडा


कोरडे पडे आज नदीचे रम्य किनारे

एकटीच लढ तुटती जेव्हा सर्व सहारे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational