झेप आकाशाची...
झेप आकाशाची...
पाखराला मनी कुणाची भिती
चाहुल लागली त्यास प्रितीची
भरवसा असते खऱ्या प्रेमावर
बिनधास्त झेप घेई आकाशाची...
निळ्या, काळ्या घन मेघातून
पडे सरसर पावसाच्या धारा
निसर्ग सजला इंद्रधनू रंगाने
झाला मोकळा आकाश सारा
जीवन हे निसर्गाच्या आधीन
असे सृष्टी त्यापासूनच चाले
होता मोकळे आकाश इथे
मनी उल्हास सुंगधापरी फुले
