STORYMIRROR

Pappu Tekale

Tragedy

3  

Pappu Tekale

Tragedy

जगाचा रिवाजच बदलला...

जगाचा रिवाजच बदलला...

1 min
12.1K

कोठून आला अन् कोठे पोहचला

जगाचा त्याने रिवाजाच बदलला..

कोणास कोणकोणता गर्व होता

व्याजासगट तो सारा बुडाला...


कोणास द्यावे आता खरे महत्व..

कुणाचे अंगीकारावे आता तत्व..

जीवनावश्यक फक्त इथं जीवत्व..

अहंकार तो त्याने मातीत गाडला..


देश सारे ते देशोधडीला लागले..

सऱ्यांच्या तोंडावर बरा वाजले..

आता का होईना पण गाव दिसले..

इतका कसा हो कोरोना गाजला..


एक ना एक दिवस जाईल तोही..

तुला इतकाही घाबरायचे नाही..

जर पाळले नियम आपण काही..

सुटेल तो जो फक्त घरात थांबला...


कोठून आला अन् कोठे पोहचला

जगाचा त्याने रिवाजाच बदलला..



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy