जग (गझल)
जग (गझल)
लय तालात आपली जुळली
बघ प्रेमात वादळे घडली
तुझे प्रेमात बोलणे नव्हते
कपटाची निती मला कळली
नव्हते कोणते तुफान तिथे
जलनौका तरी कशी बुडली
मन माझे किती किती हसले
मग पाण्यात आसवे भिजली
जग बाजार वाटते मजला
दीड पैशात माणसे विकली
