STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

जाणतो मी तुझ्या प्रेमभावना

जाणतो मी तुझ्या प्रेमभावना

1 min
2.8K


पावलावर पाऊल ठेवून माझ्या

मुग्ध होऊन चालत असतेस

मी दिलखुलास दाद देता

तुही खळखळून हसतेस

मी नकाराचा कौल देता

तुही नाक मुरडतेस

माझ्या होकाराच्या एका नजरेत

आकाशीचा क्षितिज गाठून येतेस

समोर मज पाहून भिंतीआड दडतेस

पुन्हा डोकावून पाहिल्यावर मी नसता

सैरभैर नजरेने मला शोधतेस

प्रेम करत असूनही न केल्याच करतेस बहाणा

मनात दडवून ठेवलेल्या जाणतो मी तुझ्या साऱ्या प्रेमभावना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance