जाण भविष्य
जाण भविष्य
करूनी कत्तल झाडांची अशी
मोठाल्या इमारती उभारल्या
त्यात भर म्हणून धुराड्याच्या
जेथे तिथे चिमण्या उंचावल्या.
अरे जरा ही केला नाही विचार
झाडे नसली तर प्राणवायूचे काय?
आणि पाऊस पाण्याचे काय होईल
मग जगणे सर्वांचे कठीण हाय.
आता पाण्याची बाटली घेऊन फिरतो
पाठीवर प्राणवायू घेऊन जावे लागेल
आता झाडापासून फुकट घेतो वायू
मग पाण्याला पैसे देतो तसे द्यावे लागेल.
वेळीच विचार कर जागा हो आता
अन् प्रत्येकाने एक तरी झाड लावा
त्याला वाढवायचा नियम करा आता
अन् एक तरी झाड लावून दाखवा.
भविष्याची चिंता कर तुझ्या मुलांची
त्यांना प्राणवायू घेऊन फिरावे लागेल
जीवन त्यांचे कठीण होऊन जाईल
मानवा तुला झाडे लावावी लागेल.
