जादुई चिराग
जादुई चिराग
पात्रातून येताच बाहेर धूर
येणारा आहे खूपच आतुर
फुंकताच , घासताच पटकन येई
क्षणात ऐकून क्षणात जाई
त्याला कोणतेच ठिकाण नाही
समोरच्या आदेशाची वाट पाही
काय मागाल तेच मिळणार
चुकला तर गायब होणार
असा हा जादुई चिराग
बनून जातो आनंदाचा भाग
