इतकीच खंत आहे..
इतकीच खंत आहे..
काय दोष त्या कोवळ्या जीवांचा
ज्यांनी स्वतःचं फायर
ऑडिट करून घेतलं नाही
ज्यांनी जगण्याचे टेंडर भरलं नाही.
तें जाणीव नसतांनाच होरपळलें
अनेक जण इथे जाणिवेत ही होरपळतात
श्वासातलं अंतरच असतं जगणं-मरणं
तुमचा श्वासच गुदमरलां, पण
श्वास गुदमरायला लावणारे गुडघे ही बाहेर सज्ज आहेत
तुम्हाला आगीने लपटले, पण
बाहेर फटाक्यांनी भरलेलं अननस तयारच आहे
बाहेर ऍसिड आहे, तंदूर आहे
शेवटी आगीच्या ज्वाळाच आपले सर्व प्रश्न संपवते
बाहेर हत्येला आत्महत्या ठरविणारी यंत्रणा आहे
हे सगळ पाहणं तुमच्या नशिबात नव्हतं.
