इतिहास नाही
इतिहास नाही
राणी तुझी गोष्ट खास नाही
मला प्रेमात जगण्याची आस नाही
सहन होईनात मजला तुझे दुरावे
सांग साजणी मी काय माझे करावे
मी केला प्रेमाविना कुठला ध्यास नाही
माझ्या शरीरातली आत्मा घाबरली
तू दूर कुठे जाऊन राणी अवतरली
तुझ्या प्रेमात का माझा सखे वास नाही
माझं प्रेम बनलं साजणी तुझं खेळणं
तुझ्या प्रेमात माझं एकटं अश्रू गाळणं
मी घेतला ना कधी तुझ्याविना श्वास नाही
तू स्वप्ने दाखवून कुठे निघून गेलीस
आज संगमसाठी तू का मरून गेलीस
तुझ्या माझ्या प्रेमाचा घडला इतिहास नाही
