STORYMIRROR

Prashant Shinde

Romance

4  

Prashant Shinde

Romance

हूर हूर...!

हूर हूर...!

1 min
130

हूर हूर ज्या क्षणांची

मनोमनी लागून होती

ते क्षण येता जीवनी

मज लाज वाटत होती...


लाजा होमाचा क्षण

असतो मोठा विलक्षण

सर्व सर्व अर्पूनी

येती जीवनी सौख्याचे क्षण...


अंग अंग मोहरते

तनु काया सर्वची लाजते

मनात दोघांच्याही दिसते

सनई चौघडे दिसती वाजते...


सारे सगे सोयरे वाटती परके

जोडीदार येता राजकुमार जीवनी

एकची नाव सदा राहते सदा

अंतरातल्या त्या गोड कवनी...


तो माझा मी त्याची

जाण उरात घर करते

विश्वची सारे थिटे पडता त्याक्षणी

त्याचीच प्रतिमा फक्त हृदयी उरते....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance