हसणं तुझं
हसणं तुझं
हसणं तुझं निखळ ,वाहणाऱ्या पाण्या सारख.
पौर्णिमेच्या त्या अवखळ शीतल चंद्रा सारख.
फुलांची उधळण,इंद्रधनू ची जणू बरसात,
प्रितीची अवीट गोडी ,त्या तुझ्या गोड हास्यात.
मनाला वेड लावणार,माझं भान हरपणार,
तुझं हासू कायम माझ्या चेहऱ्यावर फुलणार.
तू जाता जाता हासू मात्र तुझं मागे मागेच रेंगाळनार.
मनापासून आलेले तुझं हसणं,किती सहज,शाश्वत.
दुःखा वर माझ्या हळुच फुंकर घालनार.
जगण्याचं मला बळ देणार,मी तुझाच आहे वेडे,
अस नेहमी अश्वसत करणार.
किती सुंदर आपलंसं करणार.
हासू तुझे कायम हृदयात करेन मी जतन.
कोणाला कशाचे, मला तुझ्या हसण्याचे व्यसन.
कधी राहू नको तू उदास निराश हसत रहा नेहमी.
आयुष्यात माझ्या मग नसेल काहीच कमी.

