STORYMIRROR

Sarika Jinturkar

Tragedy Others

3  

Sarika Jinturkar

Tragedy Others

हसायचे विसरलेत सगळे..

हसायचे विसरलेत सगळे..

1 min
155

तंत्रज्ञानाच्या या युगात

 जगायचे विसरले सगळे हसण्यातला निखळ आनंद गमावून दुःखाला कुरवाळत बसतांना हसायचे विसरले सगळे 


पैशाच्या मागे धावतांना 

अंध होऊन गेले सगळे 

स्वार्थ साधण्याच्या नादात माणुसकी विसरले सगळे 


चुटकी सरशी कामे करूनी 

उत्तुंग घेतली भरारी 

या यंत्र मानवी जगात

 भावनाशून्य झाले सगळे

  दुरावा आला नात्यांमध्ये कोणाशी नाही देणे-घेणे 

जिवापाड प्रेम करणारी नाती जपायचे विसरले सगळे 


 पूर्वीचे लोक होते वेगळे

 दिखावा झाला आता सर्वत्र आपलेपण विसरले सगळे  

हसणे झाले आता फक्त ओठापुरते पोट धरून हसायला पूर्वीसारखे विसरलेत सगळे


सुखसोयी भरपूर अशी 

घरे देखील झाली पण

 घराला घरपण देणारी गोष्ट विसरले सगळे धावपळीच्या या जगात मनसोक्त जगायचे विसरले सगळे.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy