हरवलेली मी
हरवलेली मी
मीच माझ्यातली हरवली का कुठे
शोध घेऊ कसा ना कळे||धृ ||
वादळे आली
फार घोंघावती
धुसरल्या वाटाही
मार्ग ना मिळती
जावे कुठे कसे ना कळे||१||
रात्र अंधारली
का गडद जाहली
काळोख दाटती
वाटही गडपली
भीती ही मनी कशी ना कळे||२||
सूर्य माथ्यावरी
तळपतो हा किती
शोध घेऊ कुठे
ना मिळे सावली
वृक्ष सावलीचा ना कुठे मिळे||३||
