STORYMIRROR

Sharda Pawar

Abstract

3  

Sharda Pawar

Abstract

हरवलेली माणुसकी

हरवलेली माणुसकी

1 min
374

गर्दीत माणसाच्या एकटी मी 

माणूस शोधते आहे 

मुखवट्यामागे लपलेल्या चेहऱ्यामध्ये 

माणुसकी लोपते आहे 

संवेदना मिटली वेदना हरवली 

दुःखात इतरांच्या माणुसकी 

आज बिभत्स हसते आहे 


एक तुपाशी एक उपाशी जगतो 

तरीही अन्नपूर्णा इथे 

शांत निवांत झोपते आहे 

कुणाची तृष्णा अन कुणाची वासना 

नजरेत वासनेच्या स्त्रीचा 

आदर शोधते आहे 

गर्दीत माणसाच्या ....... 


धावपळ किती ती पैशांसाठी 

कुणी उरलेच नाही कुणासाठी 

आधार देण्या शब्दांचा 

शब्द विकत घेते आहे 

कुणाचे खाण्याचे वांदे 

कुणाचे पांढरपेशे काळे धंदे 

रडण्यास इथे उसंत नाही 

अंतयात्रेस आता नाही खांदे 

नात्यांच्या हरवलेल्या गोतावळ्यात 

जिव्हाळा शोधते आहे 

आपुलकी विरली माणुसकी हरली 

गर्दीत माणसाच्या एकटी मी माणूस शोधते आहे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract