आयुष्याचे सात रंग
आयुष्याचे सात रंग
आयुष्याचे इंद्रधनु
जीवनात रंगाच्या सप्तरंगांच्या
उधळलेले सात रंग,
बालपणी नारंगी गोर अंग
तारूण्यात गुलाबी काचोळी तंग
हिरवा रंग जबाबदारीचा
तारुण्याला कष्टाचा साज चढवायचा
पिवळा सोनोरी रंग कॅालेजच्या मस्तीचा
चंदेरी दिवस ते मखमली लाल
आठवणींची कुपी हद्दयात दरवळली
दु:ख असताना मलम बनली
पांढरा रंग त्यागाचा संसाररूपी रथात
क्षणोक्षणी सारथी झाला
निशीगंध रोमारोमातला प्रेमात बुडाला
जांभळा कृष्णकमळ संसाराच्या वेलींवर आनंदाने फुलला.
