का आणि कशासाठी
का आणि कशासाठी
का आणि कशासाठी?
प्रश्न फक्त दोन शब्दांचा
उलगडला तर अर्थ अवघ्या जीवनाचा
कुटुंबासाठी जगतो म्हटले तर ते म्हणतात
आमच्यासाठी कुठे काय करता?
तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडता
स्वत:साठी जगायचं ठरवतो
पुन्हा त्यांच्यातच गुरफटतो.
प्रश्न तोच का आणि कशासाठी ?
आली लहर केला कहर
असं जगायचं असत
वास्तवात तसं होत नसतं
जबाबदाऱ्यांच्या चक्रव्यूहात
परत परत अडकतो
कर्तव्य आणि क्रम यांची
आयुष्यभर सांगड घालतो
उत्तर सापडेल कदाचित
तरी शोधण्यास मी घाबरतो कारण,
सर्व माझे ही आशा फोल ठरेल
म्हणून किंचित थबकतो
खरंच सर्व माझे मानले तर प्रश्न संपतो
आणि नाही मानले तर उत्तर मिटते
आयुष्य कदाचित असेच असते
जे नाही ते मन आपलं मानते
जे आहे ते स्वीकारण्यास तयार नसते
कोडे पुन्हा तेच ,,,,, का आणि कशासाठी ???????