फक्त एक करायचय
फक्त एक करायचय
आठवणींचा गावात न रमतां,
तुझ्यासोबत मरायचंय मला
चांदण्याच ह्या कोशात न अडकता
त्या एकट्याच चंद्रासोबत फिरायचय मला
सुख असो वा दु:ख सगळं
तुझ्याच मीठीत अनुभवायच मला
स्वप्नांना तुझ्या माझ्या
तुझ्याच साथीने फुलवायचय मला
सहवास हा दिगंताचा तुझ्याचसोबत करायचाय मला
ना विरह ना आठवनी प्रत्येकक्षणी
तुझ्याचसोबत जगायचंय मला
तुझ्यासोबत घेताना उंच झोका
दूरवर एका जगात हरवायचय मला
जगणं मरण सगळं तुझ्यासवे,
फक्त मरण तुझ्या मीठीत आल
तर हसतां हासता जगाचा निरोप घ्यायचाय मला.

