चिखल स्वप्नांचा
चिखल स्वप्नांचा
किती स्वप्न मनांत पाहिली
स्वप्नांच्या त्या चिखल झाला
वरुण राजा कोपला अन्
आसवांचा इथे पूर आला
आभाळ अनितचंया ओझ्याने झुकले,
धाय मोकलून तेही रडले
चोर सोडून संन्यासाला फाशी झाली
पाहून सगळे जमीनही खचली
पंचनामे झाले पण नेमके कशाचे,
जमिनीचे, नुकसानीचे पिकांचे,
की शेतकऱ्यांच्या ईभ्तीचे प्शन काही सुटेना?
खर्च लाखांचा अन् भरपाई रूपयांत ताळमेळ कुठेच बसेना
राजकारण्यांची इथे पोळी भांजते
गरीबी फक्त भुकेने मरते
वाहून गेली पीके सारी
दुरून पाहते दुनियादारी
कसली दिवाळी अन् दसरा उभ्या पिकात पाणी कासरा कासरा,
पाणी डोळ्यांमधले आटले
आमचे दुःख मांडण्यासाठी आता अवसान नाही उरले
कर्जापायी जमीन गेली, उपाशीपोट खंगली
थडग्यापुरती जागा इथे शिल्लक राहिली
आता राहिलेत कुठे खांदे हात पण झाले पोरके,
भरभरून रडायचे पण वरूण राजाने डोळे पाडले कोरडे..!
