हरवलेले स्वप्न
हरवलेले स्वप्न


माझे हरवलेले स्वप्ने,
मला पुन्हा भेटले होते ।
वेळ जाऊन विसरलो होतो मी,
पण स्वप्न पूर्ण झाले होते ॥
जेव्हा वाट पाहत मी होतो,
वाटलं स्वप्न भगले होते ।
नशिबाचं दार ठोकीत ते,
माझ्या समोर येऊन उभे होते ॥
स्वप्न पूर्ण होत नाही,
अस म्हणता येत नाही ।
म्हणून पुढच्या आयुष्याचे,
स्वप्न पाहण मी सोडत नाही ।।
स्वप्नातील सुख दुःखे,
कोणाला सांगायची नसतात ।
मोह दाखवून स्वप्नाची,
मिळाले तर उपभोगायचे असतात ।।
नेहमी आपल्या स्वप्नांना,
आपले म्हणून जपले पाहिजे ।
आपल्यासोबत असलेले नाते,
सोज्वळपणे जोपासले पाहिजे ॥