हर्ष उल्हासी श्रावण
हर्ष उल्हासी श्रावण
येता सय श्रावणाची
मन धाव घेई माहेरासी
भेटला ग मज बंधुराया
तृप्त झाली ओढ भेटण्याची
आई पण पहात होती वाट
करण्या कोड कौतुक लेकीचे
आजी प्रेमळ नजरेने
सदा कशी पहातसे
नातवंडे भेटताच खुश होते बाबा
लाड करण्यात वेळ गेला सारा
भेटूनी मैत्रिणींना
उर आला तो भरून
नागपंचमीला झोक्यावर
झुललो सा-या जणी मनभरून
लावली हाती मेहंदी
मग सय आली
इकडल्या स्वारीची
अलवार आठवणीत
हुरवले मनोमनी
दिन पहा कसे गेले
आनंदात सणवारात
आप्त जनांच्या झाल्या भेटी गाठी
श्रावण असेच असा
वेड लावी जन मना
सृष्टी पण पहा नटली
जणु घालूनी हिरवे कंकण
मधे लाल पीत सुमनांची
भासे सुंदर गुंफण
असा ऋतु हिरवा
साजरा होई श्रावणात
म्हणूनच वदती जन
ऋतू आहेची बरवा
