हरीनाम सोहळा
हरीनाम सोहळा
देहाचे सौंदर्य
जणाचीया डोळा
मनो सौंदर्याला
न्याहळी कृष्ण बोबडा
नयनांच्या रंगास
स्तुतींचा डोलारा
निर्मळ नजरेला
कृष्ण मुरारी भाबडा
शब्दाचीया गोडी
असे वैऱ्याच्या जिव्हा
स्वच्छ भावनांसाठी
मुका मुकुंद वेडा
दुःखास ओलांडण्या
सुखाच्या धावा
सुख दुःखाची भूल
जिथे हरीनामाचा सोहळा
