STORYMIRROR

Changuna(Rudra) Nagargoje

Others

3  

Changuna(Rudra) Nagargoje

Others

.....माणुसकीचा रंग .......

.....माणुसकीचा रंग .......

1 min
181

रंगात रंगले मी , 

हव्या हव्याशा त्या .... 

ना लाल ना रंग तो गुलाबी , 

नाहूदे रंगात मदतीसाठी कोणाच्या .... 


होऊदे रंगात रंग , 

बेरंग असा मी ... 

बरसूदे कोणाच्यातरी अश्रूतून , 

आनंद रंग होऊन मी ...... 


रंगूदे अंतःकरण माझे , 

जळूदे झोळी अश्यक्यतेची .... 

पोहचूदे तिथे तिथे मज , 

गरज आहे दुखाःस आनंदात रंगण्याची ....


वाहूदे शरीरात लाल सळसळते रक्त , 

पेटूदे हृदयात बेरंग भडकती आग .... 

मिसळतील सर्व रंग माझ्यात , 

होऊदे मज असा , 

फक्त माणूसकीचा पांढरा रंग ........


Rate this content
Log in