STORYMIRROR

Changuna(Rudra) Nagargoje

Tragedy Others

3  

Changuna(Rudra) Nagargoje

Tragedy Others

............ आई........

............ आई........

1 min
365

आताड्याचा गोळा करून ,

जन्म द्यावा तिने ......

गोळ्याची मूर्ती होताच,

 अधिकार का दाखवावा दुसऱ्याने.....


 मातीत भरलेल्या पायांचाही ,

ओठानी स्पर्श करावा तिने .....

थकलेल्या हातांना आधार देण्याएवढही,

 पुण्य का नाही कमवाव त्याने.....


 त्याच्या अस्तित्वासाठी,

 आपलं अस्तित्व विकून टाकाव तिने ......

तुला नाही गं समजत ?

अगदी सहज कसकाय म्हणाव त्याने.....


 शरीराच्या प्रत्येक श्वासात ,

श्वास विरघळवला असावा तिने.....

 शेवटच्या काही श्वासासाठी ,

वृद्धाश्रमाची गरज का भासत असावी त्याला कोण जाणे ......  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy