हृदयातले प्रेम
हृदयातले प्रेम
हृदयातले प्रेम
शब्दात व्यक्त होईना
पहातो जेव्हा तुला
तुझ्यावरची नजर काही हटेना
डोळ्यातील भावना
का तुला त्या कळेना
प्रेम करतो मी तुझ्यावर
पण वळून मात्र तू पाहिना
सर्वस्व मानतो मी तुला माझे
पण साथ मात्र तु देईना
तळहातावरच्या रेषांना
का पूर्णत्वास तू नेईना
तेजस्वी ते रूप तुझे
ध्यानातून आता जाईना
दुसऱ्याची होवून गेलीस तू
पण हे मन दुसरीकडे वळेना
आयुष्यातले पहीलेच प्रेम हे
का विसरावेसे वाटेना
साथच आपुली काही क्षणांची
तरी दुरावा सहन होईना

