STORYMIRROR

काव्य चकोर

Tragedy Others

4  

काव्य चकोर

Tragedy Others

होण्याआधी..

होण्याआधी..

1 min
367

कसे फुलावे नंदनवन मनाचे

आभाळ पण हल्ली भरत नाही..

भरलेच कधी चुकून जरी

तरी भाकित खरे ठरत नाही..!!


भेगाळलेली भूई चीत्कारते असह्य

वेदनेचा फाळ रुततो मनात..

पेरावी तरी किती स्वप्ने गुलाबी

सल काट्याची तीच अंतरात..!!


कधी रुजतो हिरवा कोंब कोमल

त्यासही कोणी पायदळी तुडवतो..

केले मनात मंदिर ज्याचे

तोच पाषाण अवकाळी घडवतो..!!


तरीही जीव सृष्टिवर जडतो

पुन्हा तोच गुन्हा घडतो..

आशेचा थेंब जो कोणी शिंपडतो

नवतीची कळीही तोच खुडतो..!!


आता नाही वाटत मुक्त बहरावे

कोणाच्या ओठाचे गीत व्हावे..

होण्याआधीच निर्माल्य भावनेचे

वाटते...

आपल्याच उदरात गड़प व्हावे..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy