STORYMIRROR

Suvarna Patukale

Tragedy

3  

Suvarna Patukale

Tragedy

होईना पहाट

होईना पहाट

1 min
162

सारी रात्र काळोखाने व्यापिले मनास

होईना पहाट होईना पहाट

धावतात किती मागे

तहान ही तेव्हा जागे

काही नसताही होतो

जलाचाच भास, होईना पहाट

किती हाल सुखासाठी

निराशाच येते पाठी

नसे समाधानी कोण

जीवा वनवास, होईना पहाट

अरे अशी नाती किती

कुणावरी जडे प्रीती

आपुलेच जाळीताती

इथे शेवटास, होईना पहाट


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy