STORYMIRROR

पद्मवैखरी ठाकरे

Tragedy

4  

पद्मवैखरी ठाकरे

Tragedy

हो चूक आमचीच आहे....

हो चूक आमचीच आहे....

1 min
309

होय चुकी आमचीच आहे 

    माणसात समजून तुम्हाला 

   बंधने स्वतःवर लादतोय 

    आमच्याच हाताने आमची 

   नकळत चिता रचतोय 

अन वरुन तुमचेच अत्याचार 

मुकाटपणे सहन करतो आहे.

    होय, ही चुकी आमचीच आहे... 


रोज मरतोय बनावटी संस्कारात 

    का तर म्हणे, जन्म हा बाईचा 

नालायकीच्या पुरुषत्वासाठी 

   तो झालाय आता बिनबुडाचा 

तरीही तुमचाच सन्मान करतो आहे

    होय, ही चुकी आमचीच आहे... 


अरे लाज वाटतेय आज 

  तुम्हाला रक्षक म्हणवून घेतांना 

तुमच्या कुत्र्यांसारख्या नजरा 

 जेव्हा तिच्या अब्रूवर पडतांना 

तरी परत तुमच्यावर विश्वास ठेवतो आहे. 

    होय, ही चुकी आमचीच आहे... 


आज खरंच शंका येतेय 

  हीच का ति भूमी 

जिथे जानकी जन्मा आली ? 

  आणि इथेच का हो परवा 

तुम्ही आई दुर्गा पुजली ?  

आणि....

 तुम्हालाच आम्ही आजसज्जन समजतो आहे.

    होय, ही चुकी आमचीच आहे... 


सोबतीलाही उभी राहायची 

  लायकी नाही ज्यांची, 

इज्जतीशी खेळायची कशी 

  हिम्मत होते यांची ? 

आणि अश्याच्या ...

 खांद्याला खांदा लावूनआम्ही चालतो आहे. 

    होय, ही चुकी आमचीच आहे... 


अरे बास करा आता, 

 नको आता अबला सतिचे गुणगान 

परत नजर तिरकी उठली तर फक्त 

  आमची तलवार आणि तुमची मान 

तरीही, तुमच्यात माणुसकी शोधतो आहे. 

    होय, ही चुकी आमचीच आहे... 


तुम्ही काय तिला बाटवणार 

  तुम्ही स्वतः समाजाला विटाळ आहात 

माणूस नावाच्या शरीरात आज 

   एक हरामखोर हैवान आहात 

तरीही तुमच्या सोबत आयुष्य जगतो आहे.

    होय, ही चुकी आमचीच आहे... 


कळलंय तुमच्या जगात आता 

  आमच्यासाठी इज्जतच उरली नाही 

म्हणून तुम्हाला ना उन्नाव समजली 

  अन म्हातारीही पुरली नाही 

तरी वंशाच्या दिव्यासाठी अजूनही 

    देवासमोर साकडं घालतो आहे 

    होय, खरंच ही चुकी आमचीच आहे... 

             ही चुकी आमचीच आहे.... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy