हळव्या मनाची कहाणी
हळव्या मनाची कहाणी
प्रेमावर काय लिहू
प्रेमावर काय बोलू
गुज माझ्या मनातील
सांग मी कुठे खोलू
आहे कुपीत मनाच्या
आठवणी दडलेल्या
घालतात फूंकर त्या
मनावर खचलेल्या
हळुवार स्पर्श तुझा
रोमांचित करे मला
तुझे मधुर गोड बोल
कळी खुलवती गाला
तुझे प्रेमात रुसणे
आवडते खूप मला
दूर नको जाऊ कधी
आहे शपथ माझी तुला
दिले हृदय तुला हे
नाव तुझे माझ्या वाणी
कशी सांगू तुला माझ्या
मृदू मनाची कहाणी
