माझी आई (परदेशी मुलांची आई,)
माझी आई (परदेशी मुलांची आई,)
शिक्षणाचा मी गिरवलाय धडा
मोठी स्वप्ने घेऊन आलोय खरा
निर्जीव इकडची दुनिया सगळी
प्रेमाचा तुझ्या कुठेच नाही झरा
पहिल्याच दिवशी वाटले होते
निघून यावे मी तडक तिकडे
तुझ्यासम ममतेची ऊब देवून
प्रेमाने स्पर्शनारे नाहीत इकडे
शिकवले आईने मळायला पीठ
मी चपाती करायला लागलो
तुझ्या हातच्या गरम चपातीला
सांग ना आई मी आता मुकलो
दिलास माय तू मला जीवनी
स्वावलंबनाचा नवखा धडा
जीवन सुंदर साकारण्याला तो
गाठी संस्काराचा अनमोल घडा
उठताच मायेने फिरवायची हात
सांगायची तू जप स्वाभिमान
संस्काराचा विशाल वृक्ष तू आई
तुझा वाटायचा नेहमी अभिमान
समंजसपणाचं विशाल हृदय तू
चुकता क्षणी आम्हा देई सजा
हट्ट पुरविलेस तेव्हा नको ते माझे
तुझ्याविन जीवनाची गेली ती मजा