शेकोटी
शेकोटी
1 min
603
*शेकोटी*
थंडी पडता आठवते
शेकोटीची मजा न्यारी
गवत,कागद जाळून मग
आनंद घेती दुनिया सारी
जमा केले कागद कचरा
पेटवली त्यांनी शेकोटी
एका बहीण भावाची ही
थंडीत ठिकण्याची कसोटी
गरीब असो वा श्रीमंत
ऊब सारखीच सगळ्यांना
कुडकुडणार्या थंडी पासून
उष्णता मिळते मानवाला
शेकोटीला उब असते
मायेच्या त्या ममतेची
विसरून जाती सारे थंडी
किमया अशी शेकोटीची
वाटे गोडी नात्यामध्ये
जशी दुधातली साखर
प्रेमाची नाती साथ देता
वाढे एकमेकांचा आदर
