STORYMIRROR

shiravane medical

Others

3  

shiravane medical

Others

माझी माय

माझी माय

1 min
550


देवा तुझ्या परीस माझी मोठी आहे माय

तिच्याविना जीवनी माझ्या नाही दुजे काय. || ध्रू ||


राबून राबून पाठीचा तिच्या मोडलाय कणा,

येड इपारित वागू नको तू जीवन नाही पुन्हा

जवळ घेऊन माय मला रोज सांगत जाय.|१|


माये विना जीवनी माझा नाही तुझे काय

देवा तुझ्या परीस माझी मोठी आहे माय

तिच्याविना जीवनी माझ्या नाही दुजे काय||धृ||


बाप माझा पिऊन येतो दिसभर दारू,

कसं इनवू बापाला मी हो नको माईला मारू!

पाठीवर वळ तिच्या इत इत हाय|३|


दुःखविना जीवनी तिच्या नाही दुजे काय

देवा तुझ्या परिस माझी मोठी आहे माय

तिच

्याविना जीवनी माझ्या..........||२||


दुष्काळाची झळ लागे काय सांगू तुले

घागरभर पाण्यासाठी मैल मैल चाले

जीव जातोय भुकेने व्याकुळ घरात नाही काय|३|


गरिबीच्या झळा येथे सुख कुठे हाय

देवा तुझ्या परिस माझी मोठी आहे माय

तिच्याविना जीवनी माझ्या नाही दुजे काय||धृ||


माय माझी माझ्यासाठी कष्ट एवढं करी

अंगात तिच्या बळ नाही तरी धीर धरी

पूज्य आहेत माझ्यासाठी धरले तिचे मी पाय|४|


प्रेमाविना जीवनी माझ्या नाही दुजे काय

देवा तुझ्या परिस माझी मोठी आहे माय

तिच्याविना जीवनी माझ्या नाही दुजे काय||धृ||



Rate this content
Log in