STORYMIRROR

shiravane medical

Others

3  

shiravane medical

Others

येरे येरे पावसा

येरे येरे पावसा

1 min
242

दूर गेलास तू कुठे

जिथं हात माझा जाईना

ये परतून तू पावसा

पराधीन मी तुझ्याविना 


तुझे आभाळ दाटले

तरी येईना तू रे पावसा

वाट तुझी पहातो मी

रोज रात्रं दिवसा


किती उंच आलो मी

तुला शोधत इथवर

जाणार नाही मी एकटा

चल तू माझ्या बरोबर


किती वाट पाहतोय

माझा शेतकरी दादा

पडणार होता तू आधीच

विसरलास का तू वादा


पावसाच्या रिमझिम सरींची

आठवण होते सगळ्यांना

भिजायचे आहे पावसात मला

कधी येणार आहेस सांग ना


जमीन सुद्धा आसुसली

प्राणी पक्षी वाट पाहतात

पाण्याविना ऐक पावसा

सारेच सजीव तडफडतात


नको देऊ तू त्रास आता

ऐक तू माझी विनवणी

बरसू दे तुझ्या अखंड धारा

देते तुला मी ओवाळणी


Rate this content
Log in