मृगाची प्रतीक्षा
मृगाची प्रतीक्षा
*प्रतीक्षा मृगाची*
"”""""""""""""""""""""""""""
आतुरतेने वाट पाहतेय
मृग नक्षत्राच्या येण्याची
तापलेल्या वसुंधरेला
ओढ मृगाच्या सरींची
मृगधारा देती सृष्टीला
सुगंधी दान चैतन्याचे
धरा भिजून चिंब होते
रूप पालटते निसर्गाचे
मोठी स्वप्न बाळगून आहे
प्रतीक्षेत शेतकरी पर्जन्याच्या
साथ दिली जर पावसाने
उगविल राशी मोत्यांच्या
सज्ज झाला पिसारा मयूराचा
बेभान होऊन नाचण्यासाठी
एकमेकांशी काजवे लावी पैज
अंधारात लखलखण्या साठी
झाडावर लईत डुलतात
खोपी कोरीव सुगरणीची
फाद्यांवर घरटी बांधून पक्षी
तयारी करतात आगमनाची
पहिल्या पावसात भिजण्याची
हौस वाढते साऱ्या तरुणाईची
शहारून येते अंग अंग त्यांचे यज्ञ
आपुलकी वाटे पहिल्या मृगाची
*शबाना मुल्ला नेरूळ*
