STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Tragedy Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Tragedy Others

हिरवे रान सारे उदासी शिवारात भ

हिरवे रान सारे उदासी शिवारात भ

1 min
395

हिरवे रान सारे उदासी शिवारात भरे

भरे मोद पाखरांत ,थवा डोले माळरानी!

माळरानी सौंदर्य आरस्पानी दिसे!!

दिसे लगबग कामांची चालतसे फवारणी!

फवारणी करताना हवेत विखूरली 

गळालेली पिसे!!१!!


पीसे लागता कामांचे होई घालमेल जीवांची!

जीवांची पर्वा नाही उभ्या पिकाची त्या चिंता!!

चिंता आता मळणी करावी कधी!

कधी बहरेल शेती सुटेना तो गुंता!!२


गुंता चालंला वाढत येता आभाळ दाटून!

दाटून आला कंठ डोळे भरले पाण्याने!!

पाण्याने केला कहर झाली अतिवृष्टी यंदा!

यंदा शेतक-यांचे हाल भरली गोदामं वाण्याने!!३!!


वाण्याने केली कमाई हवालदिल शेतकरी!

शेतकरी वेडावला पार कर्जात बुडालेला!!

बुडालेला जीव कसा किनारा गाठी!

गाठी नसता रुपया जीव पार उडालेला!!४!!


उडालेला ‌पक्षी जातो उंच आभाळात!

आभाळात घालून घिरट्या येई पुन्हा घरट्यात विसाव्यास!!

विसाव्यास शेतक-यास खांदा मिळेना कुणाचा!

कुणाचा नस्ता पासपोस घ्यावा लागे फास शेतक-यास!!५!!


हि अखंडित कल्याणकारी काव्यरचना असून हिरवे रान सारे उदाशी शिवारात भरे हि सुरवातीला ओळ देण्यात येऊन काव्य त्या प्रकारात लिहिले आहे!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy