STORYMIRROR

Meena Khond

Abstract

3  

Meena Khond

Abstract

हे सारे युगा युगाने घडले

हे सारे युगा युगाने घडले

1 min
173

नववारीतून स्त्री सहावारीत आली

साडीत ती सहज खुलली..!

पुढे पंजाबी ड्रेस, टी शर्ट जीन्स घातली

नववारी ते जीन्स युगानुयुगे लागली....!


संसार सांभाळता सांभाळता

हाती पुस्तक वही, लेखणी पेन आली ..!

फोन, स्मार्ट फोन, काॅम्प्युटर आले

लाटणे ते काॅम्प्युटर युगानुयुगे लागली....!


चूल मूल कार्याच्या परीघातून

स्त्री हिंमतीने शाळेत गेली

शाळा, शिक्षण, नोकरी, हुद्दा

स्वयंपाकघर ते कार्यालय युगानुयुगे लागली....!


पावला मागून पाऊल टाकत

अनुगामिनी म्हणून वावरली.!

मुक्त स्वतंत्र उंच झेप घेतली

अनुगामिनी ते सहचारिणी युगानुयुगे लागली...!


उंबरठ्याच्या आत असलेली

अटकेपार झेंडा फडकवू लागली

राजकारण, व्यवसाय, उच्चपदस्थ अधिकारी

देश ते परदेश युगानुयुगे लागली !....


गुलामीच्या बंधनात पुरुषी अरेरावीत 

घरातच स्त्री जीवन जगली.

अस्तित्व, अस्मिता, स्वाभिमान, स्वावलंबन 

गुलामी ते व्यक्तीमत्व युगानुयुगे लागली...!

——*——*——*——*——


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract