हे नातं मैत्रीचं...
हे नातं मैत्रीचं...
हे नातं मैत्रीचं
निरपेक्षपणे जागवू,
सहज नैसर्गिकपणे
ते आपण फुलवू...
हे नातं मैत्रीचं
नसावा व्यवहार,
मैत्रीत असावा
स्वभाव दिलदार....
हे नातं मैत्रीचं
नसावे मैत्रीदिनापुरते,
जपावी आपुलकी
स्नेहभाव मागे उरते....
हे नातं मैत्रीचं
असावी प्रेमळ छाया,
मनात असावी
माणुसकीची माया....