हे जगणे गाणे व्हावे
हे जगणे गाणे व्हावे
हे जगणे गाणे व्हावे,
आनंदाचे तराणे व्हावे...
जीवनाचे गाणे सुरीले,
आनंदाने गुणगुणावे.
संघर्षाच्या लाटा उसळतील,
असेल सुखदुःखाची वाट ही,
काळी कुट्ट रात असेल,
पण उगवेल रम्य पहाटही.
सोनेरी रविकिरणे नभांगणी,
तेजोमय भासे जग देखणे,
जीवनाच्या प्रवासात या,
फुलवू आनंदाचे चमचम चांदणे.
✨✨✨✨✨✨✨✨
