STORYMIRROR

Raakesh More

Romance Tragedy Others

3  

Raakesh More

Romance Tragedy Others

हे एक दिवस घडणार आहे

हे एक दिवस घडणार आहे

1 min
149

तू येशील त्या दिवशी 

मी खूप रडणार आहे 

माझं मन जाणतंय 

हे एक दिवस घडणार आहे || 0 ||

 

असं कसं होऊ शकतं

माझी अवस्था तूला

कळणार नाही 

असं कसं होऊ शकतं 

माझी प्रीत पाहून तू

हळहळणार नाही 

माझी प्रीत तुझ्या मनात 

जडणार आहे 

माझं मन जाणतंय 

हे एक दिवस घडणार आहे || 1 ||

 

माझ्या हृदयात तुझं एक 

मंदिर बनवलंय मी 

माझ्या प्रीतीच्या फुलांनी 

हे सजवलंय मी 

माझ्या प्रेमाने तुझं हृदय 

मढणार आहे 

माझं मन जाणतंय 

हे एक दिवस घडणार आहे || 2 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance