STORYMIRROR

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Inspirational

4  

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Inspirational

हे बाप्पा

हे बाप्पा

1 min
432

हे बाप्पा श्री गजानना

तुझ करितो मी प्रथम वंदना


हे बाप्पा श्री मोरेश्वरा

तू लवकर ये माझ्या घरा


हे बाप्पा श्री विघ्नहर्ता

घरी तुझ्यामुळे अखंड प्रसन्नता


हे बाप्पा श्री मोरया

तुझ्या चरणी मी गणराया


हे बाप्पा श्री अष्टविनायका

तू सर्व भक्तांचा पाठीराखा


हे बाप्पा श्री गणेशा

तूच दाखवी सर्वांना उज्वल दिशा


हे बाप्पा श्री चिंतामणी

तूच आमच्या सदा ध्यानी मनी


हे बाप्पा तूच आमचा सुखकर्ता

आणि तूच आमचा दुःखहर्ता



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational