हा देश महान
हा देश महान


निळा, हिरवा, भगवा, पिवळा
करा साऱ्या रंगांची या होळी,
ह्या तिरंग्याचा लावा खुशाल
लावा टिळा तुम्ही कपाळी.
जाती, धर्म सोडून सारे
व्हा पाईक मानवतेचे,
जपा बंधुता नी समता
गा जयगीत एकतेचे.
मिरवू नका घेऊन झेंडे
आहे देश आपला देव,
देशासाठी जगावे,मरावे
जीवनाचं सार्थक व्हावं.
नको दंगली, रक्तपात
अहिंसा धर्म हा जपा,
विषमतेच बीज मातीतून
उखडून बंधुंनो टाका.
घ्या शपथ या मायभूची
करा अर्पण आपले प्राण,
हा देश आपला महान
मज वाटे हा अभिमान...!